HIV Health Update : चिंताजनक! महाराष्ट्रातील HIV बाधित मृत्यूंपैकी 22.6 टक्के मृत्यू मुंबईत; तर देशात 5 वर्षांत 2.94 लाखांहून अधिक एड्‌सग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले

देशासह मुंबईतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

HIV Health Update : चिंताजनक! महाराष्ट्रातील HIV बाधित मृत्यूंपैकी 22.6 टक्के मृत्यू मुंबईत; तर देशात 5 वर्षांत 2.94 लाखांहून अधिक एड्‌सग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले

नवी दिल्ली : देशासह मुंबईतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकतेच आरटीआयमधून मुंबईतील एचआयव्ही बाधित रुग्णांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात एचआयव्हीमुळे होणारे मृत्यू कमी होत असताना मुंबईत मात्र वाढता कल पाहायला मिळत आहे. 2025-26 मध्ये मुंबईतील नोंदणीकृत एचआयव्ही बाधित रुग्णांपैकी 1,258 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 2024-25 मध्ये हा आकडा 1,148 तर 2023-24 मध्ये 986 इतका होता. तसेच महाराष्ट्रातील एचआयव्हीबाधित मृत्यूंपैकी सुमारे 22.6 टक्के मृत्यू मुंबईत झाले आहेत. तज्ञांच्या मते, वाढलेल्या मृत्यूंसाठी केवळ एचआयव्ही जबाबदार नसून हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजारही कारणीभूत असू शकतात, असे सांगितले जात आहे. अनेक रुग्ण उशिरा निदान होणे किंवा उपचार अर्धवट सोडणे हीदेखील गंभीर समस्या आहे. तसेच उपचारांमध्ये सातत्य, नियमित फॉलोअप आणि समुपदेशनाची गरज अधोरेखित करण्यात आले आहे. एचआयव्हीबाबत जागरूकता आणि वेळेवर उपचारांवर भर देण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे. 

हेही वाचा : Eknath Shinde vs Ganesh Naik: कार्यक्रम पत्रिकेवरुन वाद पेटला! एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक संघर्ष चव्हाट्यावर

देशभरात राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या आणि एआरटी केंद्रांकडून ही धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहता या संपूर्ण कालावधीत एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी याबाबत राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे माहिती मागवली. त्यानुसार ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत (2021-2026) झालेल्या एकूण मृत्यूंचा विचार केला तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत एकूण 36,621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये मुंबईची आकडेवारी स्वतंत्र न धरता राज्यासोबत जोडली, तर हा एकूण आकडा 42,216 वर पोहोचतो. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number