हातात साहिलचा फोटो, न्यायासाठी पालकांची आळवणी; साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात न्याय मिळवण्याकरिता पालकांचे उपोषण

आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
Sahil Wakode
Parents Hunger Strike

आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. साहिलला न्याय मिळावा यासाठी त्याचे आई-वडील आता रस्त्यावर उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रयत्न आणि आत्महत्येपूर्वी मैत्रिणीसोबत झालेला शेवटचा फोन कॉल या दोन बाबींमुळे या प्रकरणाचा तपास अधिक कसून सुरु आहे.

या विलंबामुळे व्यथित झालेल्या साहिलच्या पालकांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या उपोषणासाठी पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली असून, पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी केली आहे.

मैत्रिणीला शेवटचा कॉल-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी साहिलचा मैत्रिणीसोबत शेवटचा कॉल झाला होता. या प्रकरणी मैत्रिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. जबाबानुसार, साहिलने परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती आणि पेपर चांगला गेला नसल्याचे सांगितले होते. परीक्षेत कॉपी करताना पकडल्याबाबतही त्या कॉलमध्ये उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास सुरु आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version