Ratnagiri News : नववर्षाच्या स्वागतासाठी गेले पण…! गुहागरच्या समुद्रात पर्यटकाचा करुण अंत

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईतील पवई परिसरात राहणारे मुथ्या कुटुंब कोकणात फिरायला आले होते. पोहण्याचा मोह न आवरल्याने ते समुद्रात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने..

Ratnagiri News : नववर्षाच्या स्वागतासाठी गेले पण…! गुहागरच्या समुद्रात पर्यटकाचा करुण अंत

Ratnagiri Guhagar Sea Drowning Case : कोकणच्या समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून, नववर्षाच्या स्वागताची तयारी करत असलेल्या एका कुटुंबाचा आनंद काही क्षणातच दु:खात बदलला आहे.

पवईतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईतील पवई परिसरात राहणारे मुथ्या कुटुंब कोकणात फिरायला आले होते. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास हे कुटुंब गुहागरच्या समुद्रकिनारी लाटांचा आनंद घेत होते. पोहण्याचा मोह आवरता न आल्याने कुटुंबातील तिघे सदस्य समुद्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोलवर ओढले गेले.

जीवरक्षकांची तत्परता: माय-लेकाचे वाचले प्राण
समुद्रात कुटुंब बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जिवाची बाजी लावत जीवरक्षकांनी एका महिलेला आणि तिच्या 14 वर्षांच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. या धाडसी बचावकार्यामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले.

हेही वाचा – Mumbai Crime News: ChatGPT चा असाही वापर? तरुणाने AI च्या मदतीने बनवला बनावट रेल्वे पास; टीसीने 'असा' पकडला बनावटगिरीचा खेळ

कुटुंबप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू
स्थानिकांनी आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असलेल्या अमोल मुथ्या यांना वाचवण्यात यश आले नाही. 42 वर्षीय अमोल यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुथ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. समुद्रातील पाण्याचा आणि भरती-ओहोटीचा अंदाज येत नसल्याने पर्यटकांनी खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. गुहागरमधील या घटनेने पर्यटनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – Local Train Update : 164 वर्षांची प्रतीक्षा संपणार ! आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा मुहूर्त ठरला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number