Sunday, February 09, 2025 05:08:56 PM

Western Railway Megablock
पश्चिम रेल्वेवर विशेष ‘जम्बो मेगाब्लॉक'

पश्चिम रेल्वेने ‘जम्बो मेगाब्लॉक’ घोषित केला आहे.

पश्चिम रेल्वेवर विशेष ‘जम्बो मेगाब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने 24,25 आणि 26 जानेवारीला  ‘जम्बो मेगाब्लॉक’ घोषित केला आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. पाहा रेल्वेचं वेळापत्रक कसं असणार आहे.  रविवार म्हटलं की मुंबईकरांच्या प्रवासाची पुरती वाट लागते. कारण रविवार हा सुट्टीचा अन् मेगाब्लॉकचा दिवस. त्यामुळे अनेक लोकल रद्द असतात आणि उशीराने धावणाऱ्या असतात.पण या आठवड्यात फक्त रविवारच नाही तर चक्क तीन दिवस ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. होय, पश्चिम रेल्वेने 24,25 आणि 26 जानेवारीला  ‘जम्बो मेगाब्लॉक’  घोषित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

पश्चिम रेल्वेवर  ‘जम्बो मेगाब्लॉक’ घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. 24, 25 आणि 26 जानेवारीला जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. या जम्बो मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. स्लो लोकल म्हणजेच धीम्या लोकल केवळ अंधेरीपर्यंतच धावणार आहेत. यात लांब पल्ल्याच्याही काही गाड्या रद्द केल्या आहेत. 

हेही वाचा : ST BUS एसटीचे भाडे किती रुपयांनी वाढले ?

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा. तांत्रिक अडचणींमुळे लोकल अंधेरीपर्यंतच असणार आहेत. रेल्वे विभागाने पूर्वकल्पना न दिल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्यांचे हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 


सम्बन्धित सामग्री