महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असताना आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर झाली आहे. या मतदार यादीनुसार 1 कोटी 3 लाख मतदार असून त्यात 53 टक्के पुरुष मतदार तर 47 टक्के स्त्री मतदार असणार आहेत. तसेच साधारणपणे प्रभागातील मतदारांची संख्या सरासरी 50 हजार इतकी आहे. प्रारूप मतदार यादीत घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 131 मध्ये सर्वाधिक 62 हजार 64 मतदार होते. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राखी जाधव यांनी आक्षेप घेतला होता. अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक 131 मध्ये 57 हजार 980 मतदार आहेत.
एकूण मतदार – 1कोटी 3 लाख 44 हजार 315
पुरुष मतदार – 55 लाख 16 हजार 707
स्त्री मतदार – 48 लाख 26 हजार 509
तृतीयपंथी – 1 हजार 99
सर्वाधिक मतदार
कुर्ला एल वॉर्ड प्रभाग क्रमांक 164 – 62 हजार 945
अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 66 – 61 हजार 799
अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक 84 –
57 हजार 261
कमी मतदार
शिव कोळीवाडा प्रभाग क्रमांक – 30 हजार 748
दहिसर प्रभाग क्रमांक 1 -31हजार 961
कमी महिला मतदार
शिव कोळीवाडा प्रभाग क्रमांक 174 – 12 हजार 604
गोरेगाव प्रभाग क्रमांक 13 – 222
सर्वात जास्त मतदार
बोरिवली प्रभाग क्रमांक 15 – 30 हजार 88
अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक 66 – 30 हजार 47
सर्वाधिक मतदार चांदिवलीत तर सर्वात कमी मतदार शिव कोळीवाड्यात