Saturday, June 15, 2024 03:51:13 PM

mahayuti campaign
महायुतीच्या प्रचाराचा दणका

शुक्रवारी दादर येथील शिवाजी पार्कात महायुतीची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत.

महायुतीच्या प्रचाराचा दणका
mahayuti sabha

मुंबई, १७ मे २०२४, प्रतिनिधी :  शुक्रवारी दादर येथील शिवाजी पार्कात महायुतीची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. 
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या सांगता सभेचे आयोजन शुक्रवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क येथे करण्यात आले आहे. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. 
या सभेस सुमारे सव्वालाख लोक उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार मैदानावर नियोजन करण्यात आला आहे. तसेच, मैदानाबाहेरूच्या लोकांसाठी परिसरात मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.


सम्बन्धित सामग्री