Friday, December 05, 2025 02:45:12 AM

Dadar Video Viral : निर्लज्जपणाचा कळस! दादर शिवाजी पार्कात संतापजनक प्रकार; सार्वजनिक ठिकाणी तरुणाने केली लघुशंका

सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती निर्लज्जपणे लघुशंका करताना दिसला आणि त्याच वेळी शेजारच्या बाकावर एक महिला बसलेली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

dadar video viral  निर्लज्जपणाचा कळस दादर शिवाजी पार्कात संतापजनक प्रकार सार्वजनिक ठिकाणी तरुणाने केली लघुशंका

Dadar Video Viral: मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती निर्लज्जपणे लघुशंका करताना दिसला आणि त्याच वेळी शेजारच्या बाकावर एक महिला बसलेली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ shivajipark_ आणि dadarmumbaikar या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी अशा निष्कृष्ट वर्तनावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - Bengaluru Jail Video: जेलमध्ये नाच, दारू आणि पार्टी! बंगळुरू तुरुंगातील कैद्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

एका युजरने लिहिलं आहे कीस  “अशा घटना शिवाजी पार्कमध्ये वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारासाठी एका व्यक्तीला मी फटके दिले होते. मोठे कार्यक्रम किंवा पोलीस परेड असते तेव्हा पार्क स्वच्छ दिसते, पण इतर वेळेस इथे दारूच्या बाटल्या, सिगारेट ओढणारे गर्दुल्ले आणि अश्लील प्रकार दिसतात.” दुसऱ्या युजरने संताप व्यक्त करत म्हटलं, “दोन मिनिटांवर सार्वजनिक शौचालय असताना, बाजूलाच महिला बसलेली असताना हे करणं अत्यंत लज्जास्पद आहे.”

हेही वाचा - Muzaffarnagar Scooter Fine: बापरे! स्कूटर चालकाला ठोठावण्यात आला 20.74 लाख रुपयांचा दंड; चालान पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

तथापी, एका यूजरने @mumbaipolice ला टॅग करून लिहिलं, “या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम 296 अंतर्गत गुन्हा दाखल करा. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागणे हे गुन्हा आहे.” इतर अनेकांनीही यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “अशा लोकांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणं आणि असभ्य वर्तन थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली पाहिजेत. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी दाखवून दिलं आहे की, मुंबईसारख्या शहरातही शिस्त आणि सभ्यतेचं भान काही लोकांनी विसरल्याचं दुर्दैवी चित्र पुन्हा समोर आलं आहे. 


सम्बन्धित सामग्री