Anil Parab: ‘प्रकरण अंगाशी आलं म्हणून महापौरबाईंनी पत्र मागे घेतलं…’; बदल्यांच्या मुद्द्यावरून अनिल परब यांची रितू तावडेंवर टीका

&quotभ्रष्टाचार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत असले, तरी त्यांचे अधिकारी आणि मंत्री त्यांना जुमानतात का?&quot असा संतप्त सवाल करत परब यांनी रितू तावडे यांच्यावरही जोरदार टीका केली.

Anil Parab: ‘प्रकरण अंगाशी आलं म्हणून महापौरबाईंनी पत्र मागे घेतलं…’; बदल्यांच्या मुद्द्यावरून अनिल परब यांची रितू तावडेंवर टीका

Anil Parab: मुंबई आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत राज्य सरकारला धारेवर धरले. “भ्रष्टाचार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत असले, तरी त्यांचे अधिकारी आणि मंत्री त्यांना जुमानतात का?” असा संतप्त सवाल करत परब यांनी रितू तावडे यांच्यावरही जोरदार टीका केली. बदल्यांच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

बदल्यांचे ‘मॉडेल’ आणि रितू तावडेंवर निशाणा
अनिल परब यांनी मुंबई महानगरपालिकेतील 120 इंजिनिअर्सच्या बदल्यांचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की, “या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘घोळ’ झाला असून मुख्यमंत्र्यांनी त्या थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापौर रितू तावडे यांनी आधी बदल्यांचे आदेश दिले आणि नंतर प्रकरण अंगाशी येईल असे वाटताच पत्र मागे घेतल्याचे नाटक केले. आमदारांची पत्रे घेऊन ती युनियनच्या पत्रांना अग्रेषित (Forward) केली जातात. हे ‘अग्रेशन’ नक्की कोणत्या दिशेला गेले आणि त्याचा ‘रेट’ काय आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळले म्हणूनच महापौरबाईंनी माघार घेतली.”

उल्हासनगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा
परब यांनी केवळ मुंबईच नव्हे, तर उल्हासनगर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. “उल्हासनगरमधील ‘रिजन्सी निर्माण’ प्रोजेक्टमध्ये हरित क्षेत्र आणि MSEB साठी राखीव असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर TDR दिला गेला. 2,47,700 चौरस मीटरच्या या घोटाळ्याची चौकशी झाली, कमिशन नेमले गेले, पण पुढे कारवाई का झाली नाही? अहवालात दोषी आढळलेल्या लोकांची नावे का लपवली जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चौकशी लावायची, सेटलमेंट करायची आणि मग विषय दप्तरी जमा करायचा, हेच सरकारचे ‘विकासाचे मॉडेल’ आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. अनिल परब यांनी आपल्या भाषणात आणखी काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. पोस्ट आणि टेलिग्रामसाठी राखीव असलेल्या केंद्र सरकारच्या प्लॉटवर बांधकाम करून तिथून लाखो रुपयांचे भाडे वसूल केले जात आहे, असंही परब यांनी सांगितलं. इमारतीची उंची कागदावर कमी दाखवून (28 मीटरऐवजी 24 मीटरखाली) लिफ्ट आणि जिना देण्याचे नियम टाळले जात आहेत, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा – Rahul Gandhi : ‘भारताने कुणाकडून तेल खरेदी करायचं हे अमेरिका ठरवतं’; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात

“हिंमत असेल तर आरोप खोडून काढा”
“मी हे सर्व पुरावे आणि कागदपत्रांसह मांडत आहे. जर तुमच्यात हिंमत असेल, तर माझे हे आरोप खोडून काढा,” असे थेट आव्हान अनिल परब यांनी सरकारला दिले. भ्रष्टाचाराला सरकारचे पूर्ण समर्थन असल्याचा आरोप करत, त्यांनी हिमालयाच्या टोकाप्रमाणे हा भ्रष्टाचाराचा केवळ वरचा भाग असून आतमध्ये खूप मोठे घोटाळे दडलेले असल्याचे संकेत दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number