MNS’s Gen-Z Dahi Handi : आधी होकार, आता नकार! दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी अचानक नाकारली परवानगी; मनसे जेन-झी हंडी फुटणार?

घाटकोपर : मनसे नेते गणेश चुक्कल यांनी जेन-झी च्या क्रांतीला सलाम करणारी दहीहंडी घाटकोपर अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत केली आहे. या दहीहंडी सोहळ्याला मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी परवानगी पत्र दिले होते. मात्र आता अचानक पोलिसांनी या दहीहंडी सोहळ्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यात […]

MNS’s Gen-Z Dahi Handi : आधी होकार, आता नकार! दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी अचानक नाकारली परवानगी; मनसे जेन-झी हंडी फुटणार?

घाटकोपर : मनसे नेते गणेश चुक्कल यांनी जेन-झी च्या क्रांतीला सलाम करणारी दहीहंडी घाटकोपर अमृत नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत केली आहे. या दहीहंडी सोहळ्याला मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी परवानगी पत्र दिले होते. मात्र आता अचानक पोलिसांनी या दहीहंडी सोहळ्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात जेन-झी पीढीने सर्वांच लक्ष वेधून घेत सातत्याने होणाऱ्या पेपर फुटीवर देशभरात क्रांती घडवून आणली होती. याच जेन-झी पीढीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना गोविंदा पथाकाच्या माध्यमातून सलाम करण्यासाठी मनसे नेते गणेश चुक्क्ल यांनी दहीहंडी सोहळा आयोजित केला आहे. या दहीहंडी सोहळ्याला आधी मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी परवानगी दिली होती. मात्र दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांनी परवानगी नाकराल्याचे पत्र आयोजकांना दिले आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Dahi Handi Utsav 2026 : मुंबई, ठाण्यासह जागोजागी रंगणार दहीहंडीचा थरार; गोविंदा पथके सज्ज, सुरक्षेसाठी प्रशासनाचा विशेष बंदोबस्त

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथे मनसेच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. मनसे नेते अमित ठाकरे या दहीहंडीला विशेष हजेरी लावणार होते. मात्र, पोलिसांनी आयोजकांना नोटीस पाठवून स्टेजचा अतिरिक्त भाग काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून रस्ता बंद होणार नाही आणि अँब्युलन्स वगैरे येऊ शकेल.  घाटकोपर येथील अमृतनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने या विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्टेज उभारण्यात आले आहे. या स्टेजमुळे सागर पार्ककडे जाणारा प्रस्तावित 90 फुटांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी, एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना मार्ग मिळणार नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा विचार करून स्टेजचा अतिरिक्त भाग हटवण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसे विभागाध्यक्ष गणेश चुक्कल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून यापूर्वीच सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. सर्व परवानग्या असताना ऐन दहीहंडीच्या आदल्या दिवशी नोटीस कशी काय दिली जाऊ शकते?" असा सवाल त्यांनी केला. शनिवारची 'जेन-झी' दहीहंडी नियोजित वेळेनुसार धुमधडाक्यात साजरी होणारच, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number