Uddhav Thackeray : ‘मुंबईतील प्रदूषण वाढण्यामागे इथला भ्रष्टाचार’, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; विकास प्रकल्पांवरूनही निशाणा

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. याशिवाय, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढगही महाराष्ट्रावर आले असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.

Uddhav Thackeray : ‘मुंबईतील प्रदूषण वाढण्यामागे इथला भ्रष्टाचार’, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; विकास प्रकल्पांवरूनही निशाणा

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून (Pollution in Mumbai) सत्ताधारी पक्षावर थेट आणि गंभीर टीका केली आहे. मुंबईची हवा आरोग्यासाठी घातक बनत चालली असून, गेल्या दोन ते तीन वर्षांत प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. "इथे इथिओपियातील ज्वालामुखीचे (Volcano) ढग आले आहेत की काय," असे वाटावे; पण हा इथल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. 'या भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबई आणि महाराष्ट्रावर रोरावत आहेत,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'नियोजनशून्य विकास' आणि मेट्रो कारशेडची टीका
मुंबईत प्रदूषण वाढण्याचे कारण स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य (Unplanned Work of Maharashtra Government) कारभाराला जबाबदार धरले. "मी मुख्यमंत्री असताना आरेमधील कारशेडला (Aarey Car Shed) तात्काळ स्थगिती दिली होती. माझा मेट्रोला विरोध नव्हता; पण आरेमध्ये जी झाडं कापली गेली, त्यामुळे प्रदूषण वाढले आहे," असा दावा त्यांनी केला. आता कांजूरमार्गची जागा या सरकारने घेतली आहे. याशिवाय, शहरात एकमेव असलेले जंगल म्हणजेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) च्या विकासाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. हे जंगल केवळ झाडांसाठीच नव्हे, तर बिबट्यांपासून अनेक प्राण्यांच्या पिढ्यांसाठी आश्रयस्थान आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – Ambadas Danve PC : "संजय शिरसाट यांचा घोटाळ्यात मोठा हात, चौकशी करा" दानवे सरकारवर संतापले

निवडणुकीत पैशांचा पाऊस; शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत 'पैशांचा धूर निघत आहे' आणि 'पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे,' असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी 'सामना' वृत्तपत्रातील अग्रलेखाचा संदर्भ देत, 'सत्तेचा माज' सध्याच्या राजकारण्यांच्या वक्तव्यातून आणि वागणुकीतून स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले. त्यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी पक्षातील एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला नाही. जिथे जातात, तिथे पैशांच्या थैल्या उघडतात आणि मते मागतात, हे चित्र भयानक आहे, अशी टीका त्यांनी केली.

कुंभमेळ्याच्या खर्चात नाशिकच्या पालकमंत्र्याचं कोडं?
मुंबईप्रमाणेच नाशिकमधील कारभारावरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होत आहे. लाखो साधूसंत आणि भाविक तिथे येणार आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सुविधा पुरवणे हे शासनाचे काम आहे." प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन भाविकांना जीव गमवावा लागला होता, याची आठवण करून देत, त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. नाशिकला आजही पालकमंत्री (Guardian Minister) नेमला जात नाही, यावरून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि 'या कोड्याचे उत्तर कुंभमेळ्याच्या खर्चात आहे का?' असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला.

हेही वाचा – Local Body Elections: आता उमेदवारांना एक दिवस जास्त प्रचार करता येणार; राज्य निवडणूक आयोगाचा नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीबाबत निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number