Weather Update: कोकणात पाऊस सुरूच, मुंबईसह ठाण्याला पुन्हा अलर्ट, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट समोर

ल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सुरू आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Weather Update: कोकणात पाऊस सुरूच, मुंबईसह ठाण्याला पुन्हा अलर्ट, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सुरू आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचणं, वाहतुकीत अडथळे निर्माण होणं, तसेच नवरात्र उत्सवाच्या तयारीवर पावसाचा परिणाम होत आहे. मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांप्रमाणे आज दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईत दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन आणि बस वाहतुकीवर पावसाचा थेट परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विशेष म्हणजे नवरात्रीच्या निमित्ताने संध्याकाळी होणाऱ्या दांडिया-गरबा कार्यक्रमांना पावसाचा मोठा फटका बसू शकतो. ठाणे व नवी मुंबई परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारनंतर जोरदार सर पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाण्यातील ग्रामीण भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे. नवी मुंबईत बेलापूर, वाशी, नेरुळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai Street Race : मुंबईत पहिली FIA-ग्रेड स्ट्रीट रेस; नवी मुंबई जागतिक नकाशावर

पालघर जिल्ह्यात आज वाऱ्याचा वेग मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. नदी-नाल्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण तुलनेने कमी असेल. या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता असून आकाश दिवसभर ढगाळ राहील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number