दाढी करावी की नाही? नखं कापणं योग्य की अयोग्य? नवरात्रीच्या नऊ दिवसांतील नियम जाणून घ्या

राज्यभरात उद्यापासून नवरात्रोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात होणार आहे.

दाढी करावी की नाही? नखं कापणं योग्य की अयोग्य? नवरात्रीच्या नऊ दिवसांतील नियम जाणून घ्या

राज्यभरात उद्यापासून नवरात्रोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो.

उद्या पहिली माळ असून, पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची उपासना केली जाते. उद्यापासून घटस्थापना होणार असून पुढील दहा दिवस भाविकांकडून देवीची विधिवत पूजा, उपासना आणि आरती केली जाणार आहे.

दरम्यान, या पवित्र काळात देवीच्या पूजेदरम्यान कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घेऊया…

नवरात्रीत या 5 गोष्टी टाळाच, अन्यथा…

1. सात्त्विक आहारालाच प्राधान्य द्या
नवरात्रीत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. या काळात सात्त्विक भोजनालाच महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये कांदा-लसूण देखील टाळला जातो. उपवास आणि घटस्थापना करणाऱ्या भाविकांनी आहारात शुद्धता जपणे गरजेचे मानले जाते.

2. केस, नखं आणि दाढी कापणे टाळा
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत केस कापणे, नखं कापणे आणि दाढी करणे अशुभ मानले जाते. ही कामे नवरात्री सुरू होण्यापूर्वी किंवा दसऱ्यानंतर करावीत, अशी परंपरा आहे.

हेही वाचा – उद्यापासून सुरू होणार शारदीय नवरात्री; जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि उत्सवाची A to Z माहिती

3. मनात संयम आणि वाणीत गोडवा ठेवा
नवरात्री हा केवळ उपवासाचा नव्हे तर मनावर संयम ठेवण्याचाही काळ आहे. या दिवसांत रागावणे, कटू बोलणे किंवा कुणाचे मन दुखावणे टाळावे. वाणी गोड ठेवल्याने देवीची कृपा राहते, अशी मान्यता आहे.

4. घरातील वाद-विवाद टाळा
नवरात्रीत घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा राखणे महत्त्वाचे मानले जाते. या काळात घरात भांडण, वादविवाद किंवा कलह होऊ नये याची काळजी घ्यावी. कुटुंबात प्रेम आणि आदराचे वातावरण ठेवल्यास सणाचा आनंद द्विगुणित होतो.

5. सात्त्विक विचार आणि शिस्तीचे पालन करा
नऊ दिवस शक्य तितके शांत राहणे, सकारात्मक विचार करणे आणि दैनंदिन शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने मन प्रसन्न राहते आणि भक्तीमध्ये एकाग्रता वाढते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number