डोंबिवली – सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक सुदृढतेच्या दृष्टीने रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउन या संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. संस्थेने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी School R-Athon या नावाने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले. या उपक्रमामध्ये डोंबिवली आणि कल्याण परिसरातील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर मॅरेथॉन स्पर्धा आज डोंबिवलीतील विको नाका येथील रेजन्सी अनंतम संकुलाच्या अंतर्गत रस्त्यावर पार पडली. विशेष म्हणजे, समाजातील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देखील संधी मिळावी या उद्देशाने 250 हून अधिक सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना माफक दरात सहभागी होण्याची संधी रोटरी क्लबने उपलब्ध करून दिली.
👉👉 हे देखील वाचा : गोंदियात दुर्मिळ शस्त्रक्रिया, महिलेच्या पोटातून काढला 1.67 किलोचा किडनी स्टोन
कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी रोटरी प्रांत मंडळ 3142 चे प्रांतपाल रो. दिनेश मेहता सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तर डोंबिवलीचे माजी कॅबिनेट मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी मुख्य अतिथीपद भूषवले. कल्याण ग्रामीणचे आमदार श्री. राजेश मोरे देखील या मॅरेथॉनसाठी विशेष उपस्थित होते.
रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. संस्थेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.