नथ, ठुशी अन् कोल्हापुरी साज; प्रत्येक दागिन्यात दडलीये खास कहाणी

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा येथील पारंपरिक दागिन्यांमधून सुंदरपणे दिसून येते. कोल्हापुरी साज, नथ, ठुशी, मंगळसूत्र अशा दागिन्यांना मराठमोळ्या साजशृंगारात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दागिन्याची रचना, त्यामागील परंपरा आणि खासियत वेगळी आहे.

कोल्हापुरी साज: कोल्हापुरी साज हा महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांमधील एक खास दागिना आहे. सोन्याच्या 21 पानांनी सजलेल्या या साजामध्ये दशावतार, अष्टमंगळ आणि मण्यांची सुंदर रचना पाहायला मिळते.

1 / 7

नथ: महाराष्ट्रीयन नथ हा पारंपरिक दागिना मोती आणि रंगीबेरंगी खड्यांनी सजवलेला असतो. नाकाच्या डाव्या बाजूला घातली जाणारी नथ मराठमोळ्या सौंदर्यात खास भर घालते.

2 / 7

कानफूल: कानात घातला जाणारा हा गोलाकार किंवा फुलाच्या आकाराचा सुंदर दागिना आहे. याला कुडकं किंवा कानातले फूल असेही म्हणतात.

3 / 7

मंगळसूत्र: काळ्या मण्यांसह सोन्याच्या मण्यांनी सजवलेला हा पारंपरिक दागिना विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रात मंगळसूत्राला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

4 / 7

पुतळीहार: पुतळीहार हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोन्याचा हार आहे. या हारामध्ये सोन्याच्या नाण्यांसारख्या पुतळ्यांवर देवी लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असते. त्याची आकर्षक रचना आणि धार्मिक महत्त्व यामुळे हा हार मराठमोळ्या दागिन्यांमध्ये विशेष स्थान राखतो.

5 / 7

ठुशी: ठुशी हा सोन्याच्या बारीक मण्यांपासून बनवलेला पारंपरिक गळ्यातील दागिना आहे. गळ्याला घट्ट बसणारा हा हार मराठमोळ्या लूकला खास पारंपरिक टच देतो.

6 / 7

पाटल्या/तोडे: पाटल्या आणि तोडे हे महाराष्ट्रातील पारंपरिक सोन्याचे दागिने आहेत. मनगटात घातले जाणारे हे जाड सोन्याचे कडे हिरव्या बांगड्यांसोबत परिधान केले जातात. लग्नसमारंभ आणि सणांमध्ये हे दागिने मराठमोळ्या लूकला खास पारंपरिक टच देतात.

7 / 7
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number