Most Dirtiest Things In Home : नेहमीच्या वापरातील 'या' वस्तू आहेत सर्वात अस्वच्छ; जाणून घ्या
आपल्या अवतीभवती अशा अनेक वस्तू आहेत, ज्या प्रमाणापेक्षा जास्त अस्वच्छ आहेत.
जर या वस्तूंना वेळोवेळी स्वच्छ नाही केले, तर आपल्याला अनेक प्रकारे घातक आजार होऊ शकतात.
चला तर जाणून घेऊया त्या वस्तू कोणकोणत्या आहेत.
पाणी पिण्याची बॉटल: रोजच्या वापरातातील वॉटर बॉटल्सना जर अधूनमधून स्वच्छ नाही केले, तर त्यावर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात. एका अभ्यासादरम्यान, असे आढळून आले की बॉटलच्या झाकणाजवळ बॅक्टेरियाची संख्या सर्वाधिक असते, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरवाजाचा हँडल: घरात येताना किंवा बाहेर जाताना अनेकजण सातत्याने मुख्य दरवाजाच्या हँडलचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, दरवाजाच्या हँडलला वेळेत स्वच्छ न केल्यास, त्यातील घातक बॅक्टेरिया अनेक आजारांना आमंत्रण देतात.
टीव्ही किंवा एसी रिमोट: टीव्ही पाहण्यासाठी किंवा एसी सुरू करण्यासाठी घरातील सदस्य रिमोटचा वापर प्रामुख्याने करतात. त्यामुळे, रिमोटवर मोठ्या प्रमाणात जंतू आणि बॅक्टेरिया वाढतात. जर वेळोवेळी रिमोटला स्वच्छ नाही केले, तर आजारांत वाढ होऊ शकतो.
उशी आणि टूथब्रश : घरात नेहमी वापरण्यात येणाऱ्या उशी आणि ब्रशमध्ये देखील अधिक प्रमाणात बॅक्टेरिया असतात. त्यामुळे, उशी, टूथब्रश, आदी वस्तू नेहमी स्वच्छ करा.
मेनू कार्ड: हॉटेल, कॅफे किंवा रेस्टॉरंटच्या मेनू कार्डला अनेकजण स्पर्श करतात. त्यामुळे यावर अनेक घातक बॅक्टेरिया असतात. इतकंच नाही, तर बऱ्याचदा या मेनू कार्डला वेळोवेळी स्वच्छ केले जात नाही, त्यामुळे यावर अनेक बॅक्टेरिया जमा होतात.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)