Red Fort History : देशाच्या राजधानीत वसलेल्या लाल किल्ल्याचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या रंजन गोष्टी

भारताची राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला जगप्रसिद्ध आहे. देश-विदेशातून पर्यटक लाखोंच्या संख्येने याठिकाणी भेट देतात. पण तुम्हाला माहीत आहे, लाल किल्ला कोणी, कधी आणि का बांधला? पाहुयात

Red Fort History : देशाच्या राजधानीत वसलेल्या लाल किल्ल्याचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या रंजन गोष्टी

1 / 8

भारताची राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला जगप्रसिद्ध आहे. देश-विदेशातून पर्यटक लाखोंच्या संख्येने याठिकाणी भेट देतात. पण तुम्हाला माहीत आहे, लाल किल्ला कोणी, कधी आणि का बांधला? पाहुयात

2 / 8

मुघल सम्राट शाहजहाँची राजधानी आग्रा होती. शाहजहाँने 1638 मध्ये मुघल साम्राज्याची राजधानी दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर लाल किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली

3 / 8

लाल किल्ल्याचे बांधकाम 1638 मध्ये सुरू झाले आणि 1648 मध्ये किल्लाचे बांधकाम पूर्ण झाले. दिल्लीतील लाल किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधण्यात आला

4 / 8

लाल किल्ला हा लाल वाळूच्या दगडांनी बांधलेला असल्यामुळेच त्याला ''लाल किल्ला'' असे नाव पडले आहे. जेव्हा हा किल्ला बांधला होता, तेव्हा सजावटींसाठी अनेक मौल्यवान हिऱ्यांचा वापर करण्यात आला

5 / 8

परंतु 1857 मध्ये जेव्हा इंग्रजांनी लाल किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी किल्ल्यावरील मौल्यवान हिऱ्यांना बाहेर काढले आणि लष्करी चौकी म्हणून लाल किल्ल्याचा वापर केला

6 / 8

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला, तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात

7 / 8

विशेष म्हणजे, लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे 2011 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते

8 / 8
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number