Sardar Vallabhbhai Patel 150th Jayanti : सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यामधील नडियाद येथे शेतकरी कुटुंबात झाला.
वल्लभभाई पटेल बॅरिस्टर होते. मात्र, शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतीबाबतचीही माहिती होती.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते.
कणखर नेतृत्वाच्या बळावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 565 संस्थांनांना भारतात एकत्र केले, ज्यामुळे भारताची राष्ट्रीय एकता साधली गेली. या कारणामुळे, त्यांंना ''लोहपुरुष'' असे म्हटले जाते.
1947 ते 1950 या कालावधीत सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते.
स्वातंत्र्यानंतर, हैदराबाद आणि जूनागढ ही संस्थाने होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही दोन्ही संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली नव्हती. अखेर, लष्करी कारवाईच्या सहाय्याने हैदराबाद, जूनागढ यांच्यासह इतर अनेक संस्थान भारतात विलीन झाले. यामुळे, भारताचे एकीकरण करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ''राष्ट्रीय एकता दिवस'' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे नागरिकांमध्ये एकता वाढवण्यासाठी, भारताच्या राजकीय आणि सामाजिक बांधणीत त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी केला जातो.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला स्मृतीनिमित्त गुजरातमधील केवाडियामधील नर्मदा नदी येथे 31 ऑक्टोबर 2018 रोजी ''स्टॅच्यू ऑफ युनिटीे''चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुतळ्याची उंची 182 मीटर असून हा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे.