Uddhav Thackeray At MNS Deepotsav 2025 : उद्धव ठाकरेंच्या शुभहस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 17 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा दीपोत्सव आंनदात आणि उत्साहात पार पडतो. यंदा, या दीपोत्सव सोहळ्याचे 13 वे वर्ष आहे.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
ठाकरे बंधूंसह व्यासपीठावर शर्मिला ठाकरे, रश्मि ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य, राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे आणि इतर मंडळी उपस्थित होते.
''या रोषणाईचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात येवो'', अशा सदिच्छा यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांना दिल्या.
या शुभप्रसंगी, शर्मिला ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे, खासदार संजय राऊत, ठाकरे बंधू, राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे आणि इतर मंडळी उपस्थित होते. या दीपोत्सव सोहळ्याला शिवसैनिक आणि मनसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.