सांगली: सांगली जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूर शहराच्या नामंतर प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर ईश्वरपूर नावाने ओळखले जाणार आहे. इस्लामपूर शहराच्या नामंतराला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर आता केंद्र सरकारने देखील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली. यामध्ये इस्लामपूर शहराचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
हेही वाचा: Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: रविंद्र धंगेकरांचा पोस्ट शेअर करत मुरलीधर मोहोळांवर आरोप
राज्य सरकारकडून नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर केंद्रा सरकारने देखील मंजुरी दिली असल्यामुळे नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्लामपूर शहर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे.