विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला होता. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, हे रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते.