Mukhed Election: नांदेडमधील तरुणी बनली राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका; भाजपच्या तिकीटावर 21 वर्षाच्या स्नेहाची बिनविरोध निवड

मुखेड नगरपरिषदेतून स्नेहा तमशेट्टे या तरुणीची बिनविरोध निवड झाली असून त्या महाराष्ट्रातील यावर्षीच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत.<br/>

Mukhed Election: नांदेडमधील तरुणी बनली राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका; भाजपच्या तिकीटावर 21 वर्षाच्या स्नेहाची बिनविरोध निवड

Mukhed Election: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्याने आता निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार रिंगणात राहणार, याचे चित्र स्पष्ट झाले असतानाच राज्यात तब्बल शंभर ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एका 21 वर्षीय तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुखेड नगरपरिषदेतून स्नेहा तमशेट्टे या तरुणीची बिनविरोध निवड झाली असून त्या महाराष्ट्रातील यावर्षीच्या सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या आहेत.

भाजपने मुखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक 4 (महिला ओबीसी) मधून स्नेहा तमशेट्टे यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली होती. प्रारंभी काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवारांसह चार उमेदवार स्पर्धेत होते. मात्र छाननीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारासह एका अपक्षाचा अर्ज अपात्र ठरला. यानंतर स्नेहा तमशेट्टे आणि त्यांची चुलती जयश्री तमशेट्टे अशा दोघींमध्ये स्पर्धा राहिली.

हेही वाचा – 'मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता करू नका…'; भरसभेत बावनकुळे असं का म्हणाले?

स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी जयश्री तमशेट्टे यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्याने स्नेहा तमशेट्टे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच प्रभागात जल्लोषाचा माहोल तयार झाला. नागरिकांनी त्यांच्या घरी भेट देत अभिनंदनाचा वर्षाव केला.

हेही वाचा – Dombivli Politics: भाजपला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

दरम्यान, केवळ 21 व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत स्नेहा तमशेट्टे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. स्नेहा तमशेट्टे यांनी आता त्यापेक्षाही कमी वयात स्थानिक राजकारणात प्रवेश करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  
 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number