नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन पुकारणाऱ्या कॉक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्या पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्याचा इशारा सरकारला दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेण्यात आलं होत. मात्र त्यानंतरही आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या देशभरातील तरुणांवर कारवाई केली जात आहे. सरकारकडून अद्यापही आंदोलक विद्यार्थी आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या कारवाईला विरोध करत सीजेपीने मोदी सरकारला पुन्हा आंदोलनाचा थेट इशारा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना सोडून देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. तरी देखील विद्यार्थ्यांना तुरुंगात ठेवलं जात आहे, त्यांची चौकशी केली जात आहे. कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. यावेळी अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, ‘पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा होणारा छळ सुरूच राहिल्यास, कॉक्रोज जनता पार्टी लवकरच एका मोठ्या शांततापूर्ण आंदोलनाने प्रत्युत्तर देईल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांची सूडबुद्धीने शिकार करणे थांबवले पाहिजे.’ असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
हेही वाचा- Saurav Das: ‘कंगनाला तिच्या पक्षातही किंमत नाही’ सीजेपी प्रवक्ते सौरव दास नेमकं काय म्हणाले?
सौरव दास यांच्याकडून सुप्रीम कोर्टाचा दाखला
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्या मतानुसार सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार सध्या जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार तपास चालूच ठेवावा, असे या आदेशात म्हणण्यात आले आहे. याच अंतरिम आदेशानंतर सीजेपीने असमाधन व्यक्त करत पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. तसेच निर्देश क्रमांक 4, ज्यात सरकारांना विद्यमान एफआयआर चालू ठेवण्याची आणि तपास करण्याची परवानगी दिली आहे, हे अत्यंत गंभीर चिंता निर्माण करणारे आहे, असे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं आहे. भारत सरकारने या देशातील युवकांना 25 जुलै 2026 रोजी दिलेल्या आश्वासनाच्या थेट विरोधात हा आदेश आहे. त्यात स्पष्टपणे सांगितले होते की, एफआयआर रद्द केल्या जातील आणि शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलकावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कारवाई केली जाणार नाही. त्याच गंभीर आश्वासनाच्या आधारे आणि पूर्ण सद्भावनेने कॉकरोच जनता पार्टीने आपले देशव्यापी आंदोलन मागे घेतले होते, असेही सौरव दास यांनी म्हटलंय.