Sanjay Raut: ‘…म्हणून सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई’; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

तब्बल 21 दिवस शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या वांगचुक यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी, त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करून सरकारने त्यांचा आवाज दाबल्याचे राऊत म्हणाले.<br/>

Sanjay Raut: ‘…म्हणून सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई’; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Sanjay Raut: नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित 'राम मंदिर लूट' विरोधी एल्गार सभेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या सभेवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच केंद्र सरकारने लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने कारवाई केल्याचा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तब्बल 21 दिवस शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या वांगचुक यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी, त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करून सरकारने त्यांचा आवाज दाबल्याचे राऊत म्हणाले.

अयोध्या आणि प्रभू रामाच्या मंदिराला चोरांपासून मुक्त करण्याची लढाई
नागपूरमधील आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत यांनी हा लढा राजकीयच असल्याचे उघडपणे मान्य केले. ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर मुक्तीचा ऐतिहासिक लढाही राजकीयच होता, त्यामुळे आता मंदिराला चोरांच्या विळख्यातून सोडवणे हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या एल्गार सभेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा भेदभाव न करता सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Abhijeet Dipke Parents Reaction: '25 दिवस झाले लेकरं उपाशी आहेत…'; जंतर-मंतरवरील आंदोलनावरून अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा सरकारवर निशाणा

आम्हाला रामरक्षेचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही; राऊतांचा विरोधकांना टोला
रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर तोफ डागताना राऊत यांनी कडक शब्दांत सुनावले. अयोध्येच्या पवित्र मंदिरात सध्या जे बसले आहेत आणि ज्यांनी तिथे आर्थिक गैरव्यवहार केला आहे, तेच लोक स्वतःला रामभक्त म्हणवून घेत आहेत. आम्हाला रामरक्षा म्हणता येते की नाही, याचे प्रमाणपत्र अशा लोकांनी देण्याची अजिबात गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी 12 वाजता नागपुरात पोहोचणार असून, सायंकाळी 4 वाजता रामनगर येथील राम मंदिरातून या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number