मुंबई: मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टी (CJP) या संघटनेने मुंबईत तीव्र आंदोलन छेडले आहे. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 6 येथे CJP कडून ‘मुंबई चलो’ या हाकेअंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पदावरून हटले नाहीत, तर संपूर्ण मुंबईकर मतदारयादीतील अन्यायाविरोधात आणि ‘व्होट चोरी’विरुद्ध मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा – मुंबई पोलिसांच्या वागणुकीचा किस्सा सांगत दिपकेंचा मोठा दावा; सभेत नेमकं काय म्हणाले?
राजीनाम्याशिवाय माघार न घेण्याचा CJP चा पवित्रा
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कारभारावर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन तीव्र गतीने सुरूच राहील असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. ‘Gaddaar Gyanesh MUST go’ आणि ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’ अशा आक्रमक घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर परिसर दणाणून सोडला. दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले.
Mumbai showing up to reclaim democracy!!
I hope all are heading here to support this protest by the CJP! The BJP’s despotic regime has snatched away our vote, our voice and that’s what we must reclaim! This isn’t political, this is about the country! This about our… https://t.co/NcD4kptHq3 — Aaditya Thackeray (@AUThackeray) October 2, 2026
निवडणूक आयोगाने सर्व दावे फेटाळले
दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजावर आणि आयुक्तांमधील कथित मतभेदांवरून सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व आरोपांचे आणि मतभेदांच्या बातम्यांचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. आयोगाने जारी केलेल्या स्पष्टीकरणानुसार, निर्णय प्रक्रियेतील मतभेदांचे दावे पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. सर्व अंतिम निर्णय हे पूर्णपणे कायदेशीर नियमांना धरून आणि एकमतानेच घेतले जातात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, विरोधक आणि आंदोलक आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.