Sunetra Pawar DCM Of Maharashtra : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी आज, शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अगदी साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनेत्रा पवारांसोबत त्यांचे धाकटे चिंरजीव जय पवार देखील उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते दिसून आहे. राज्याचे राज्यपाल […]

Sunetra Pawar DCM Of Maharashtra : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा अजित पवार यांनी आज, शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अगदी साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनेत्रा पवारांसोबत त्यांचे धाकटे चिंरजीव जय पवार देखील उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते दिसून आहे. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. 

हेही वाचा : Parth Pawar Meet Sharad Pawar: बारामतीत चक्र फिरणार? पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, कारण समोर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पक्षाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न पक्षासमोर उभा होते. परिणामी, 30 जानेवारी रोजी अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. अखेर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय यांच्या पाठिंब्यानंतर त्यांची पत्न आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला. तसेच आज, 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी खासदारीचा राजीनामा दिला असून त्यांनी पक्ष बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. पुढे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number