Operation Tiger Photo Viral : ठाकरेंच्या खासदारांची ती गुप्त भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं होतं; घटनाक्रम उघड

मुंबई : ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतरचा गोपनीय फोटो समोर आला आहे. गेल्या महिन्यातील 17 जून रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शासकिय निवासस्थानाचे हे फोटो असून यामध्ये ठाकरेंचे बंडखोर खासदार दिसून येत आहेत. यावेळी ठाकरेंच्या पाच खासदारांसह श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. ऑपरेशन टायगर ठरल्यानंतर पाच खासदार कोणालाही खबर न लागता दिल्लीतील लीला हाॅटेलला पोहोचले. त्यानंतर प्रताप सरनाईक आणि श्रीकांत […]

Operation Tiger Photo Viral : ठाकरेंच्या खासदारांची ती गुप्त भेट, दिल्लीत नेमकं काय घडलं होतं; घटनाक्रम उघड

मुंबई : ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतरचा गोपनीय फोटो समोर आला आहे. गेल्या महिन्यातील 17 जून रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शासकिय निवासस्थानाचे हे फोटो असून यामध्ये ठाकरेंचे बंडखोर खासदार दिसून येत आहेत. यावेळी ठाकरेंच्या पाच खासदारांसह श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. ऑपरेशन टायगर ठरल्यानंतर पाच खासदार कोणालाही खबर न लागता दिल्लीतील लीला हाॅटेलला पोहोचले. त्यानंतर प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे ही वेगवेगळ्या ठिकाणाहून लीला हॉटेलला पोहोचले. सकाळी 7.30 वाजता पाच खासदार, प्रताप सरनाईक आणि श्रीकांत शिंदे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले. पुढे त्या पाच खासदारांनी सकाळी साडेनऊ वाजता ओम बिर्ला यांच्यासमोर उपस्थित राहून सह्या केल्या. त्याआधीच सकाळी 6.30 वाजता खासदार ओमराजे निंबाळकर सही करून पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. 

हेही वाचा : Moshi Building Collapse : मुख्यमंत्र्यांनी घेतला मोशी इमारत दुर्घटनेचा आढावा; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे प्रशासनाला दिले निर्देश

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 बंडखोर खासदारांनी 22 जून 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का देण्यात आला. ऑपरेशन टायगर 2.0 अंतर्गत हे पक्षांतर झाल्याचे सांगितले गेले. या सहा बंडखोर खासदारांमध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील-आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश होता. दरम्यान, दिल्लीतील या फोटोमध्ये ओमराजे निंबाळकर वगळता इतर पाच खासदार दिसून येत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number