Uday Samant On BJP: ‘टीका करायला अजित पवार समर्थ आहेत, आपण फक्त…’; उदय सामंतांचा भाजपला टोला

आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही, ते काम मित्रपक्ष म्हणून अजित पवार उत्तमरीत्या पार पाडत आहेत, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला.

Uday Samant On BJP: ‘टीका करायला अजित पवार समर्थ आहेत, आपण फक्त…’; उदय सामंतांचा भाजपला टोला

Uday Samant On BJP: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रचाराचा शंखनाद करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आपल्याला कुणावरही टीका करण्याची गरज नाही, ते काम मित्रपक्ष म्हणून अजित पवार उत्तमरीत्या पार पाडत आहेत, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. पुण्याचा महापौर आता शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय होऊच शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही 120 उमेदवार उभे करून दाखवले 

भाजपकडे रोख धरत सामंत म्हणाले की, "काही लोकांचा असा समज होता की शिवसेना 40 उमेदवार सुद्धा उभे करू शकणार नाही. पण आम्ही अवघ्या काही तासांत 120 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. जर थोडा जास्त वेळ मिळाला असता, तर आम्ही 165 पैकी 165 जागा लढवल्या असत्या." पुण्यात शिवसेनेची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : "आम्ही मोठे भाव आहोत त्यामुळे…अजित पवारांना" त्या विधानावर बावनकुळेंच मोठं विधान

'शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती' असा सामना

पुण्यातील लढाई ही विकासाची आणि विश्वासघाताची असल्याचे सांगत सामंत यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर 'धनशक्ती' वापरल्याचा आरोप केला. पुणे शहर ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही. पुणेकरांना विकास हवा आहे आणि एकनाथ शिंदे यांनी केलेले काम घराघरांत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा – Municipal Election 2026: विमानतळ, महापुरापासून सुटकेसाठी 4,000 कोटींचा प्रकल्प…; देवेंद्र फडणवीसांनी सांगलीकरांसाठी केल्या खास घोषणा

दरम्यान, उदय सामंत यांनी म्हटलं की, पुण्याचा पुढचा महापौर ठरवताना शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही. ज्याप्रमाणे 2004 मध्ये मी तरुण म्हणून निवडणूक लढलो, तशीच संधी यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना दिली आहे. शिवसेना-भाजप युती नैसर्गिक असली तरी आम्हाला कमी लेखणाऱ्यांना निवडणुकीच्या निकालातून उत्तर देऊ. ज्या ज्या भागात गेलो तिथे लोकांनी शिवसेनेला आशीर्वाद देणार असल्याचं सांगितलं आहे, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं. तथापी, सामंत यांनी कार्यकर्त्यांना पुढचे 14 दिवस अहोरात्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात शिवसेनेचा 'एक नंबर'चा पक्ष बनवण्याचे स्वप्न त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number