Rohit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणात FIR दाखल, रोहित पवार यांचा महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा

अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांनी दाखल केलेली झिरो FIR महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

Rohit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणात FIR दाखल, रोहित पवार यांचा महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा

Rohit Pawar: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात रोहित पवार यांनी कर्नाटकात दाखल केलेली ‘झिरो FIR’ आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नव्या दिशेने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

23 मार्च रोजी बेंगळुरूतील पोलिस ठाण्यात ही FIR दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ती बारामती ग्रामीण पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत कर्नाटक पोलिसांचे आभार मानले असून आता महाराष्ट्र पोलिसांनी निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, अशी मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ अपघात नसून यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे. त्यांनी याआधी मुंबई आणि बारामती येथेही तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र FIR नोंदवली गेली नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये पहिली FIR दाखल; रोहित पवार यांनी मानले कर्नाटक सरकारचे आभार

28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ हा विमान अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले गेले होते, मात्र आता या प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी पुढे येत आहेत.

रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत विमानाच्या देखभालीबाबत गंभीर त्रुटी, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि नोंदींमध्ये गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विमानाच्या उड्डाण तासांबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे. अधिकृत नोंदीपेक्षा प्रत्यक्ष उड्डाण जास्त झाले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:Soniya Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; मध्यरात्री रुग्णालयात दाखल, प्रकृती कशी आहे? वाचा सविस्तर

याशिवाय, अपघाताच्या वेळी हवामानाची स्थिती आणि दृश्यता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आवश्यक नियम पूर्ण न करता लँडिंगला परवानगी देण्यात आली का, असा सवालही त्यांनी केला आहे.

तसेच, फ्लाइट क्रूमध्ये शेवटच्या क्षणी बदल, उड्डाणात झालेला विलंब आणि काही इतर घटनांमुळे संशय अधिक गडद झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणाचा तपास निष्पक्ष झाला पाहिजे. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.” आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे आला असल्यामुळे पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number