Cabinet Decision: अजितदादांच्या ‘त्या’ तीन इच्छा मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्ण; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Cabinet Decision: अजितदादांच्या ‘त्या’ तीन इच्छा मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्ण; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या राजकारणातील दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः अजित पवारांनी अखेरच्या काळात पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या कामांना सरकारने तत्काळ मंजुरी दिली आहे.

अजित पवारांच्या संकल्पांना सरकारची साथ
दरम्यान, निधनापुर्वी काही दिवसांपासून अजितदादांनी महसूलमंत्र्यांकडे खालील कामांबाबत पाठपुरावा केला होता. अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्यांच्या मतदारसंघातील आणि प्रशासकीय कामांना गती देण्यात आली:

बारामती क्रीडा संकुल: बारामतीच्या क्रीडा संकुलाच्या कामासाठी 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
औद्योगिक क्रांती (MIDC): वालचंदनगर-रत्नापूर एमआयडीसीसाठी 1000 एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील.
प्रशासकीय बळकटीकरण: महसूल कामकाजात गती आणण्यासाठी राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

महसूल विभागात डिजिटल क्रांती 
तथापी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेला ऐतिहासिक प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला आहे. आता महसूल प्रकरणांमध्ये पक्षकारांना 'इलेक्ट्रॉनिक मेल'द्वारे (Email) नोटीस पाठवणे कायदेशीररीत्या वैध ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 230 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे आता जमिनीशी संबंधित प्रलंबित खटल्यांची सुनावणी जलद गतीने होईल आणि नोटीस पोहोचण्यास होणारा विलंब टाळता येईल.

हेही वाचा – Devendra Fadnavis: विजयाचा गुलाल उधळताच फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना; अमित शाह यांच्या भेटीत 'या' मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब?

बैठकीची सुरुवात आणि श्रद्धांजली
बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचला आणि मंत्रिमंडळाने अजित पवारांना अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देऊन त्यांचे मंत्रिमंडळात स्वागत केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number