Friday, February 13, 2026 09:56:56 AM

Ambadas Danve: 'उदय सामंतच भाजपमध्ये जाणार, भाजपने त्यांना...' अंबादास दानवे यांचा मोठा दावा

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षा, राजकीय वाद, उमेदवार अपहरण आणि शेतकरी आंदोलनावर आपले मत स्पष्ट केले.

ambadas danve उदय सामंतच भाजपमध्ये जाणार भाजपने त्यांना अंबादास दानवे यांचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपले स्पष्ट मत मांडले. महिला व बलात्कारासंदर्भातील विधानांवर त्यांनी स्पष्ट केले की, अशा घाणेरड्या प्रतिक्रिया करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी, कारण हे वर्तन निषेधार्ह आहे. प्रचाराबाबत त्यांनी सांगितले की, स्थानिक स्तरावर प्रचार सुरु झाला आहे आणि सत्ताधारी पक्षांना प्रचारासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही.

उदय सामंतांच्या भाजपमध्ये जाण्याच्या अफवा वादावर त्यांनी मत व्यक्त करत म्हणाले की, काही लोक उदय सामंतच भाजपमध्ये जाण्याच्या अफवा आहेत. त्यात सत्यता आहे असे काही जण म्हणतात. असं म्हणतात एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास नकार दिला तर उदय सामंत यांना भाजपने घेण्याची तयारी दर्शवली होती.  त्यांनी स्वतः शिवसेनेतच ताकदीने लढत असल्याचे सांगितले. गिरीश महाजन वादावर बोलताना दानवे म्हणाले की, संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे, तर गिरीश महाजन का बाबासाहेबांचे नाव घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला.

विकास गोगावले विधानावर त्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, राज्यातील अनेक गुन्हे, ड्रग्ससापडणे, बंदुकीचे प्रकार यावर कारवाई होत नाही. निलंगा उमेदवाराच्या अपहरण घटनेवर त्यांनी पोलीस निष्क्रिय असल्याची टीका केली. आंदोलकांच्या मुंबई कूचसंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, शेंडी व पारंबी तुटो निर्णय होईपर्यंत आंदोलनासाठी हलू नये.

 


सम्बन्धित सामग्री