Ajit Pawar Last Rites: गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करत घेतलं अजितदादांचं अंतिम दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंतिम दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.

Ajit Pawar Last Rites: गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करत  घेतलं अजितदादांचं अंतिम दर्शन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. बारामतीत आज त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून वातावरण अतिशय भावूक झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल झाले. अंत्यविधी स्थळी पोहोचल्यानंतर अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आणि जड अंतःकरणाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. तिघांनीही एकत्र येत अजित पवारांच्या पार्थिवास अभिवादन केले. काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या चितेवर सरण रचले. हा क्षण पाहून पत्नी सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबीय, नातेवाईक आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.

अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने बारामतीत दाखल झाले आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उसळलेला जनसागर पाहायला मिळत आहे.

मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून आज शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number