Monday, March 09, 2026 09:35:16 PM

Ajit Pawar Funeral: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून देशभरातील नेते श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

ajit pawar funeral उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून आज बारामतीत भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळपासूनच बारामती आणि परिसरात नागरिक, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर उपस्थित होते. अमित शहांसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील बारामतीत पोहोचले आहेत.

आज सकाळी वाजता पूर्ण शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून विविध राजकीय पक्षांचे नेते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


सम्बन्धित सामग्री