Manikrao Kokate on Amol Mitkari: अमोल मिटकरी ‘माझे गुरु’; माणिकराव कोकाटेंकडून मिटकरींचं कौतुक

माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत विशेष उल्लेख करत त्यांची प्रशंसा केली. कोकाटे यांनी मिटकरींना आपले 'गुरु' संबोधले.

Manikrao Kokate on Amol Mitkari: अमोल मिटकरी ‘माझे गुरु’; माणिकराव कोकाटेंकडून मिटकरींचं कौतुक

Manikrao Kokate on Amol Mitkari: अकोला शहरातील झुनझुनवाला सभागृहात नुकताच जिल्हा कार्यकर्ता व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत विशेष उल्लेख करत त्यांची प्रशंसा केली. कोकाटे यांनी मिटकरींना आपले ‘गुरु’ संबोधले. त्यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीत मिटकरींनी आपल्या मतदारसंघात सभा घेतल्यामुळेच ते अवघ्या तीन हजार मतांनी विजयी होऊ शकले. बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात. मात्र, मी आज आणि उद्याही आमदार मिटकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

राजकीय वर्तुळात चर्चा

गेल्या पाच कार्यकाळांपासून सिन्नर मतदारसंघातून विविध पक्षांच्या तिकिटावर विधानसभेत निवडून येणारे कोकाटे, तसेच पहिल्यांदाच विधान परिषदेवर पोहोचलेले मिटकरी या दोघांमधील गुरु-शिष्य संबोधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Navratri 2025: अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना;15 स्क्रीनवरून देवीच्या पूजनाचं थेट प्रक्षेपण

या कार्यक्रमात बोलताना कोकाटे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचे आवाहन केले. अजित पवारांचे हात बळकट करा, असं आवाहनही माणिकराव कोकाटे यांनी केलं. दरम्यान, शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना कोकाटे यांनी सांगितले की, सरकार सर्वच आमदारांना समान निधी वाटप करत आहे. मात्र शहरनिहाय निधीचे हेड बदलल्यामुळे काही ठिकाणी रकमेतील फरक दिसतो. 

हेही वाचा – Eknath Shinde On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

कुंभमेळ्यासाठी स्थापन झालेल्या समितीत इतर पक्षांच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान मिळाल्याचा आरोपावर प्रतिक्रिया ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number