खूशखबर! अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीजेचं गिफ्ट; सरकारतर्फे दिवाळीपूर्वी मिळणार 2000 रुपये

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीची भाऊबीज म्हणून 2000 रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले.

खूशखबर! अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीजेचं गिफ्ट; सरकारतर्फे दिवाळीपूर्वी मिळणार 2000 रुपये
anganwadi sevika and helper

मुंबई : राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीची भाऊबीज म्हणून 2000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा अंगणवाडी आणि मदतनीसांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यात 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यामुळे, दोन्हीची एकूण पदसंख्या 2,14,097 एवढी कार्यरत आहे. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा : राज्यातील 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर! दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचे धडाधड निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number