Worli Assembly Constituency: वरळीत ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का? सचिन अहिर यांच्यानंतर आता ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या रडारवर

मुंबईतील वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरेंना आणखी एक खिंडार पाडण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरू केली आहे.

Worli Assembly Constituency: वरळीत ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का? सचिन अहिर यांच्यानंतर आता ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या रडारवर

Worli Assembly Constituency: शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आता मुंबईतील वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरेंना आणखी एक खिंडार पाडण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरू केली आहे. राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी शिंदे गटाकडून एका खास रणनीतीचा वापर केला जात आहे.

काय आहे 'सेम टू सेम' सचिन अहिर पॅटर्न?
दरम्यान, सचिन अहिर ज्याप्रमाणे 2022 मध्ये अविभाजित शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या अधिकृत चिन्हावर विधान परिषदेवर निवडून आले होते, अगदी तशीच स्थिती सुनील शिंदे यांचीही आहे. 2021 मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली नव्हती, तेव्हा सुनील शिंदे धनुष्यबाणावरच आमदार झाले होते. हाच तांत्रिक मुद्दा पुढे करत शिंदे गटाने त्यांना आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मूळ चिन्हावर निवडून आल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतराची कायदेशीर कारवाई करणे ठाकरे गटासाठी अत्यंत क्लिष्ट ठरेल, याचाच फायदा घेऊन 2027 पर्यंत आमदारकीची मुदत असलेल्या सुनील शिंदेंना गळाला लावण्याचे मनसुबे रचले जात आहेत.

वरळीचा गड राखण्याचे ठाकरेंसमोर मोठे आव्हान
सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर त्यांना विधान परिषदेचे उपसभापती पद दिले जाण्याची चर्चा रंगली असतानाच, आता सुनील शिंदे यांच्याबाबतही अशाच घडामोडी घडत आहेत. या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ठाकरे गटाची ताकद पूर्णपणे मोडीत काढणे हा आहे. वरळीतील 2 मोठे चेहरे गळाला लागल्यास आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मुंबईत मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे.

हेही वाचा – Raj Thackeray: 'सत्ता गेल्यावर भाजपलाही रडावं लागेल…'; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने चर्चांना बळ
दरम्यान, सचिन अहिर यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सुनील शिंदे यांनी व्यक्त केलेली उघड नाराजी या संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 'माध्यमांशी बोलताना सुनील शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. सचिन अहिर यांच्या हालचालींची आपल्याला पूर्वकल्पना आली होती, परंतु आपण छोटे कार्यकर्ते असल्याने बोलू शकलो नाही; मात्र आता पक्षाच्या वरिष्ठांनी यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,' असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळेच ते ठाकरे गटात नाराज असून लवकरच शिंदे गटात जाऊ शकतात, या शक्यतेला मोठी बळकटी मिळाली आहे.

ठाकरे गटाकडे उरलेले विधान परिषदेचे संख्याबळ
सुनील शिंदे यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चिंतेमध्ये आता ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदारांची संख्या अवघ्या 5 वर आली आहे. यामध्ये सुनील शिंदे यांच्यासह ज. मो. अभ्यंकर, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number