धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा आरोप असलेल्या खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून त्याचे 100 व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच सध्या पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरातची SIT चौकशी पूर्ण झाली असून पोलिस अशोक खरातची चौकशी करून कोर्टाकडे रवाना झाले आहेत. स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात हा गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांच्या कोठडीत होता. आज भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार असून त्याला कोर्टात हजर केले गेले.
आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी नाशिक सत्र न्यायालयात सरकारी वकिलांकडून आणि पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. दरम्यान सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या 7 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा- Ashok Kharat Case : “धक्कादायक निकाल लावून देतो” खरातचं ‘ते’ विधान चर्चेत; खरात प्रकरणाला नवे धागेदोरे
नाशिक सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी काय सांगितले?
खरातने खडे कुठून आणले? जे मिश्रित पाणी द्यायचे ते कुठून आणले? 21 जिवंत काडतुसे सापडले, 5 वापरलेले जिवंत काडतुसे सापडले… कस्तुरी वापरत होता, ते हरणाची शिकार करून आणली का? त्याचा तपास करायचा आहे. सिद्ध दोष पूजा करण्यासाठी तो सांगायचा… वाघ, साप दाखवायचा ते जिवंत होते की नकली? ते तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत आहे त्यानुसार पोलीस कस्टडी हवी आहे. अघोरी कृत्याचा कायदा असताना देखील ते कृत्य करत होता.
घर झडतीत राजमुद्रा मिळालेले आहेत. पिस्टल जप्त केले त्यात 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. मालमत्ता कागदपत्रे मिळाले आहे, अनेकांना त्याने फसविले आहेत, त्याच्या तक्रारी पुढे आहेत. आरोपी 67 वर्षाचा आहे तो 30 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना दिसतो. मागे 7 दिवसांचा पीसीआर दिला होता, त्या तपासात अघोरी कृत्य समोर आले आहे. साप कुठून आणत होता त्याचा तपास करायचा आहे. हरणाची शिकार केल्याचा संशय आहे, त्याने अनेकांना कस्तुरी दिली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात डिजिटल पुरावे जमा करायची आहे, आणखी 7 दिवसांचा वाढीव पीसीआर द्यावा. यानंतर आता पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.