सांगलीच्या ईश्वरपूर येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिलीप पाटील यांचा वाढदिवस व आत्मचरित्र प्रकाशन समारंभात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपण आपल्या पक्षात मी हुकूमशाह असल्याचं एका जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं.
माझ्या पक्षात मी सांगेल तेच होतं असं पुन्हा एकदा त्यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले काय स्थान आहे हे सर्वांसमोर स्पष्ट केले. मागच्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या भेटीगाठीने जयंत पाटील भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचाही दावा वारंवार होत असल्याने जयंत पाटील यांनी जाहीर सभेत मोठा खुलासा केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
जयंत पाटील यांचे निकटवर्ती दिलीप तात्या पाटील यांनी राजकारणातून स्वेचा निवृत्ती घेतल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन कार्यक्रमावेळी जयंत पाटील यांनी हे आपले मत सर्वांसमोर मांडले. यावेळी बोलताना आमच्या पक्षात रिटायरमेंट नसते. त्यामुळे रिटायरमेंटचा निर्णय मागे घ्या असे आवाहन करत इथं मी म्हणेल तेच होतं मी हुकूमशाह आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.