Beed Election : आताची मोठी बातमी! मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत अश्विनी संतोष देशमुखांचा पराभव

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचा आज निकाल लागला आहे.

Beed Election : आताची मोठी बातमी! मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत अश्विनी संतोष देशमुखांचा पराभव

बीड मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त झाले होते. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात गावातील  2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याचा आज निकाल लागला आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली असून 84 टक्के मतदान झाले आहे.

ही निवडणुक जिल्ह्यातील एकूण 88 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा हा भाग होता. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा पराभव झाला असून स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी बाजी मारली आहे. दरम्यान मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला असून सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभव स्विकारावा लागला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number