Shivsena Thackeray Dasara Melava : ‘..हा खरा विजयादशमीचा उत्सव आहे’; ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंची राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा पारंपारिक दसरा मेळावा रंगणार आहे.

Shivsena Thackeray Dasara Melava : ‘..हा खरा विजयादशमीचा उत्सव आहे’; ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंची राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

मुंबई: मुंबईतील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा पारंपारिक दसरा मेळावा रंगणार आहे. विजयादशमीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची ज्वलंत आणि जिवंत असलेली ओळख या मेळाव्यातून ठसकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, मेळाव्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 

'देशाची लोकशाही, संविधान आणि जनतेचा आवाज कैद होऊ नये, यासाठी संकल्प करणे हा खरा विजयादशमीचा उत्सव आहे', असे अग्रलेखात नमूद करण्यात आले. 'सध्याचे राज्यकर्ते फक्त उत्सव साजरे करण्यात रमले असून प्रजा मात्र समस्यांनी होरपळत आहे', असा टोलाही यावेळी लगावला गेला. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, मणिपूरमधील अशांतता, पहलगाम हल्ल्यातील शहीदांचे कुटुंबीय तसेच, बिहारमधील मतचोरी यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले गेले. 

हेही वाचा: Uddhav Thackeray : 'लाडक्या बहिणींना 6 महिन्याचे हप्ते एकत्र द्या'; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

'जनतेच्या असंतोषाला दडपण्यासाठी सत्ताधारी जाती-धर्माचा आधार घेत आहेत', असा आरोप करण्यात आला. याशिवाय, बेरोजगारी, रुपयाचे अवमूल्यन आणि देशातील संसाधनांचे आदानींसारख्या उद्योगपतींना स्वस्तात विक्री या मुद्द्यांवरूनही अग्रलेखातून हल्ला चढवण्यात आला आहे. 'रामाचा रावणावर विजय हा खऱ्या शक्तीने झाला होता, निवडणूक आयोगाच्या पाठिंब्याने नाही', असे सांगत सत्ताधारांच्या 'नकली हिंदूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले'.

'राष्ट्र परकीयांमुळेच नव्हे, तर स्वकीयांच्या हुकूमशाहीमुळेही गुलाम बनले. या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाटी संघर्ष हाच खरा विजय आहे', असे आवाहन सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आले. त्यामुळे, यंदाचा दसरा मेळावा पुन्हा एकदा ठाकरेंच्या जोरदार राजकीय गर्जनेचा साक्षीदार ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number