Ashish Shelar On Thackeray Brothers : ‘चाफा’ बोलेना चाफा चालेना…’; ठाकरे गट आणि मनसे युतीवर आशिष शेलार यांची मिश्किल टीका

संपुर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईच लक्ष्य ठाकरे बंधुंच्या युतीकडे लागलं आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

Ashish Shelar  On Thackeray Brothers : ‘चाफा’ बोलेना चाफा चालेना…’; ठाकरे गट आणि मनसे युतीवर आशिष शेलार यांची मिश्किल टीका

नुकताच 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यभरात सर्व राजकीयपक्ष लगबगीला लागले आहेत. अशातच संपुर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईच लक्ष्य ठाकरे बंधुंच्या युतीकडे लागलं आहे.

हेही वाचा- BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर! कोणत्या प्रभागात सर्वाधिक आणि कमी मतदार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. यासंदर्भात नुकतीच एक अपडेट समोर आली होती ती म्हणजे, दोन्ही भाऊ शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ही अपडेट समोर येत आहे. अशातच ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे. यापुर्वी देखील मुंबईत ठाकरेंच्या लागलेल्या फलकावून देखील भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट केलं आहे.

शिवतीर्थावरील चाफा !!

“चाफा” बोलेना चाफा चालेना… चाफा खंत करी काही केल्या फुले ना…

गेले संजय राऊत घरी…
म्हटली मैत्रीची गाणी…
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले अनिल परब सोबती…
गंध दरवळला शिवतीर्थावरी
जुने मतभेद विसरले रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम !

तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना… चाफा काही केल्या फुले ना !!
(कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number