Vidhan Parishad Election 2026 : ठरलं! भाजप या दिवशी जाहीर करणार विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी; दिल्ली दरबारी होणार नावांवर शिक्कामोर्तब

सध्या राज्यातील राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.

Vidhan Parishad Election 2026 : ठरलं! भाजप या दिवशी जाहीर करणार विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी; दिल्ली दरबारी होणार नावांवर शिक्कामोर्तब

मुंबई : सध्या राज्यातील राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. त्यातच भाजप विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी गुरुवार, 30 एप्रिल रोजी जाहीर करणार असल्याचे समजते. यंदा मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याचे दिसून येत आहे. तर भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी नेतेमंडळींची मोठी भाऊगर्दी झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून 30 जणांची यादी दिल्ली नेतृत्वावर पाठवण्यात आली होती. मात्र, ही यादी निम्मी करुन पाठवा, असा निरोप दिल्ली नेतृत्वाने दिला होता. तर भाजपकडून 14 नावं आता दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नावं निश्चितीसाठी दिल्लीला पाठवल्याचे समजते. यावेळी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

हेही वाचा : Weather Update: राज्यात उष्णतेचा पारा वाढला! कोणत्या भागात रेड, येलो आणि ऑरेंज अलर्ट? संपूर्ण यादी पाहा

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number