Chandrashekhar Bawankule: ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर बावनकुळेंची जहरी टीका; म्हणाले, "एकाने लिहायचं अन् दुसऱ्याने…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या प्रचारात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील गटबाजीच्या चर्चांना फेटाळले.

Chandrashekhar Bawankule: ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर बावनकुळेंची जहरी टीका; म्हणाले, &quotएकाने लिहायचं अन् दुसऱ्याने…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांपासून ते ठाकरे बंधूंच्या मुलाखतीपर्यंत सर्वच मुद्द्यांवर भाजपची रोखठोक भूमिका मांडली. "भारतीय जनता पक्ष हा दीड कोटी सदस्यांचा एक मोठा परिवार असून, देवेंद्र फडणवीस हे या परिवाराचे एकमेव आधारस्तंभ आहेत. काँग्रेसमधील गटबाजीचे प्रतिबिंब भाजपमध्ये शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी करू नये," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना सुनावले.

भाजपमधील अंतर्गत कलहाच्या चर्चांवर पडदा टाकताना बावनकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार हे आमचे अत्यंत ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते आहेत. त्यांच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही. स्थानिक पातळीवर काही प्रश्न असू शकतात, पण भाजपमध्ये गटतटाचे राजकारण कधीच चालत नाही. पक्षात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा अंतिम असतो आणि संपूर्ण पक्ष त्या आदेशाचे पालन करतो." या विधानातून त्यांनी भाजपमध्ये केवळ फडणवीसांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आगामी संयुक्त मुलाखतीवर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. "या मुलाखतीमध्ये कोणतेही नावीन्य उरलेले नाही. एकाने स्क्रिप्ट लिहून द्यायची आणि दुसऱ्याने ती वाचायची, असा हा प्रकार आहे. जनतेला आता या भावनिक राजकारणात रस उरलेला नाही आणि कोणीही याला गांभीर्याने घेत नाही," असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य 'राजकीय धमाक्या'ची हवाच काढून घेतली. विरोधक केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण बॅकफूटवर; लातूरमधील विलासराव देशमुखांवरील त्या वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली जाहीर माफी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना बावनकुळे यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. "महायुतीचे सर्व उमेदवार दोन-तृतीयांश बहुमताने निवडून येतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाची पावती जनता या निकालातून देईल. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हे समीकरण आता जनतेच्या मनात पक्के बसले आहे," असे ते म्हणाले.

नुकत्याच चर्चेत आलेल्या बिनविरोध निवडणुकांच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "जास्तीत जास्त निवडणुका बिनविरोध होणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. जर स्थानिक पातळीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक विकासासाठी एकत्र येत असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे," असे सांगत त्यांनी बिनविरोध निवडीचे समर्थन केले. या विधानातून त्यांनी विरोधकांच्या 'दबाव तंत्रा'च्या आरोपांना एकप्रकारे प्रत्युत्तर दिले.

शेवटी, महायुतीचा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असून एकनाथ शिंदे यांना विकास कळतो, असे बावनकुळे यांनी नमूद केले. "विरोधकांकडे केवळ टीका आहे, पण आमच्याकडे राज्याच्या विकासाचा ठोस रोडमॅप आहे. याच विकासाच्या जोरावर महायुती ऐतिहासिक विजय नोंदवेल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या या दौऱ्यातून बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: Aaditya Thackeray: 'कोस्टल रोडचं काम आम्ही केलं, आम्ही फोटो दाखवतो तुम्ही पण…'; आदित्य ठाकरेंचं भाजपला आव्हान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number