BJP National Committee List : भाजप राष्ट्रीय कार्यकारणीची यादी समोर; तावडेंवर राष्ट्रीय महामंत्रीपदाची, तर भारती पवारांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

BJP National Committee List : भाजप राष्ट्रीय कार्यकारणीची यादी समोर; तावडेंवर राष्ट्रीय महामंत्रीपदाची, तर भारती पवारांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

BJP National Committee List : भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली असून यात अनेक दिग्गज नेत्यांचे पुनरागमन झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या या नवीन 42 सदस्यांच्या यादीत ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या नवीन टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांचा समावेश करण्यात आला असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदार पदाची धुरा देण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांची नवी रचना

पक्षाच्या नव्या संरचनेत स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीस (General Secretary) म्हणून, तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासोबत तीरथ सिंह रावत, भारती पवार राम माधव, बैजयंत ‘जय’ पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंग बादल, लाल सिंग आर्य, प्रा. एम. नागराज, प्रा. तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्र कर या 13 नेत्यांचा समावेश आहे. संघटन सरचिटणीस म्हणून बी.एल. संतोष काम पाहतील. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचीही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे.

हेही वाचा – 

राष्ट्रीय सचिव आणि खजिनदार पदांची जबाबदारी

पक्षाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या यादीत 16 नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, भोला सिंग, डॉ. प्रदीप वर्मा, जगदीश ईश्वरभाई पटेल, डॉ. संदीप पाठक, फंगनॉन कोन्याक, संगीता यादव, अनिल अँटोनी, डॉ. एम. व्यंकटेशन, मनोज टिग्गा, सिद्धार्थ शंभू, डॉ. स्वदेश सिंग, मृगांका देव बर्मन, रोहन गुप्ता आणि जय प्रकाश यांचा समावेश आहे. खजिनदारपदी पियुष गोयल तर सह-खजिनदारपदी राजेश मंगल यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय तरुण चुघ यांच्याकडे कार्यालय प्रभारी आणि संबित पात्रा यांच्याकडे ईशान्य भारताच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आघाड्या, माध्यम आणि आगामी निवडणुकांचे गणित

विविध मोर्च्यांची जबाबदारी वाटून देताना हेमांग जोशी (युवा मोर्चा), रूप कुमारी चौधरी (महिला मोर्चा), अमरपाल मौर्य (OBC मोर्चा), बन्सीलाल गुर्जर (किसान मोर्चा), शिवेश कुमार राम (SC मोर्चा), मन्नालाल रावत (ST मोर्चा) आणि कुंवर बासित अली (अल्पसंख्याक मोर्चा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम समन्वयक म्हणून अनिल बालुनी तर सोशल मीडिया समन्वयक म्हणून दीपक म्हस्के काम पाहतील. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या नव्या 42 सदस्यांच्या टीममध्ये प्रादेशिक समतोल, जातीय समीकरणे, तरुण चेहरा आणि महिलांचे प्रतिनिधित्व यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number