‘शिक्षकांनी माझी किंमत…’; अमरावतीत पराभवानंतर भाजप बंडखोर उमेदवार संगीता शिंदेंच्या स्टेट्सची सर्वत्र चर्चा

शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक हे 19 व्या बाद फेरीअंती 3,660 मतांची भक्कम आघाडी घेऊन विजयाच्या जवळ पोहोचले असून संगीता शिंदे यांच्या विजयाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे.

‘शिक्षकांनी माझी किंमत…’; अमरावतीत पराभवानंतर भाजप बंडखोर उमेदवार संगीता शिंदेंच्या स्टेट्सची सर्वत्र चर्चा
Sangeeta Shinde

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे (बोंडे) यांनी सोशल मीडियावर ठेवलेले एक स्टेट्स सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये अपेक्षित मते न मिळाल्यामुळे झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक हे 19 व्या बाद फेरीअंती 3,660 मतांची भक्कम आघाडी घेऊन विजयाच्या जवळ पोहोचले असून संगीता शिंदे यांच्या विजयाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे.

व्हॉट्सॲप स्टेट्सवरून व्यक्त केली प्रतिक्रिया

निवडणुकीचे कल स्पष्ट होताच आणि केवळ 2,112 इतकीच मते मिळाल्याचे समोर आल्यानंतर संगीता शिंदे यांनी आपली तीव्र निराशा व्यक्त केली. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर लिहिले की, “आदरणीय गुरुजन धन्यवाद, आज खूप आनंद झाला, मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिले.” मतदानापूर्वी त्यांनी “माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचा आशीर्वाद आहे, शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट करून मीच विजयी होणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या कलांनी त्यांच्या दाव्यांचा पुरता बोजवारा उडवला आहे.

19 व्या फेरीअंती उमेदवारांच्या मतांची ताजी स्थिती

प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, 19 व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे किरण सरनाईक यांना 9,168 मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे असून त्यांना 5,508 मते मिळाली आहेत. तर, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे हे 5,202 मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. या कलांवरून किरण सरनाईक यांनी मुख्य प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा –  मुंबईत सुनेत्रा पवारांनी भाकरी फिरवली; झिशान सिद्दीकी यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

विजयाचा कोटा गाठण्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू

अमरावती मतदारसंघात पहिल्या पसंतीचा निर्धारित 16,134 मतांचा विजयी कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आणि बाद फेरीची प्रक्रिया राबवली जात आहे. आघाडीवर असलेल्या किरण सरनाईक यांना विजयाची अधिकृत रेषा ओलांडण्यासाठी अजून 6,966 मतांची आवश्यकता आहे. ही मते ते दुसऱ्या पसंतीक्रमातून कशी मिळवतात आणि अधिकृत विजय कधी घोषित होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number