महाराष्ट्र: भाजपा पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन शिर्डी येथे पार पडलं. या महाअधिवेशनात व्यासपीठावर महापुरुषांच्या प्रतिमांसोबतच संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. 'श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी' अशी या अधिवेशनाची टॅगलाईन होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या महाअधिवेशनाती सांगता झाली. भाजपाने याठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजवलं असलं तरी देशाच्या संविधानाची प्रत ठेवल्याचा विषय राजकीय पटलावर वादाचा ठरलाय. यावर कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले अतुल लोंढे?
भाजपाने दररोज संविधानाची पायमल्ली केली आहे.
संविधानाची प्रत महापुरुषांच्या प्रतिमेसोबत ठेवली हा काँग्रेसचा विजय आहे.
ज्यांनी संविधानाला प्रखर विरोध केला त्यांच्या प्रतिमांसह संविधान ठेवलं आहे.
त्यामुळे यांच्या संविधान निष्ठेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
मनुस्मृती जोपर्यंत पूर्णपणे नाकारत नाही, तोपर्यंत ही बेगडी निष्ठा शंकेच्या घेऱ्यातच राहील.
भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलून टाकणार असं सांगत कॉंग्रेसनं दिलेला 'संविधान बचाव' हा नारा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. त्याचा परिणाम लोकसभेतील निकालावर दिसून आला. महाराष्ट्रातील अनेक जागा भाजपला गमवाव्या लागल्या. भाजपा संविधान बदलणार नाही, हा फेक नरेटिव्ह काँग्रेस पसरवत असल्याचे भाजपाच्या सर्व नेत्यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर भाजपाने विधानसभा निवडणुकीत हा अपप्रचार मोडून काढला आणि घवघवीत यश मिळवले. महाअधिवेशनात भाजपाने संविधानाच्या प्रतीचं पूजन करून काँग्रेसला चोख उत्तर दिलंय