सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र त्यापुर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
हेही वाचा- BJP Mumbai Candidate List: मुंबईत भाजपकडून 136 उमेदवारांची यादी जाहीर; नार्वेकरांच्या घरात 3 जणांना तिकीट
उमेदवारी दिली नसल्याने भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या छत्रपती संभाजी नगरातील भाजपच्या कार्यालयात उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान भाजप कार्यकर्त्ये जोरदार आक्रमक झाले असून त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावेंची गाडी देखील रोखल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपोषणकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले होते. भाजप जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष समाजकार्याचा प्रयत्न करणार आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग करत आंदोलन केले आहे. तसेच ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांची उमेदवारी रद्द करावी. आमचा पक्षावर राग नाही तर स्थानिक नेत्यावर राग असल्याचे देखील कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.
शेवटच्या क्षणापर्यंत अनेकठिकाणी यावरुन गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर भाजपच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नाही. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची उमेदवारी बाद झाली ज्यामुळे भाजपमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयात उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार राडा घातल्यामुळे मोठी गडबड झाली आहे. यामुळे भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.