आगामी निवडणुकांसाठी भाजप युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर; पहा कोणाला मिळाली संधी?

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी संयुक्तपणे भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे.
आगामी निवडणुकांसाठी भाजप युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर; पहा कोणाला मिळाली संधी?
BJP Yuva Morcha New Team

BJP Yuva Morcha New Team: महाराष्ट्रातील आगामी सार्वत्रिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी संयुक्तपणे भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या फळीमध्ये एकूण 29 धडाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कार्यकारिणीतील सर्वच्या सर्व 29 चेहरे हे 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. नवोदित आणि आक्रमक तरुण नेतृत्वाला संधी देऊन पक्षाची ताकद तळागाळात वाढवण्याचा भाजपचा हा मोठा डाव मानला जात आहे.

नांदेडच्या 28 वर्षीय शंभवी साळे यांची ‘युवती प्रमुख’पदी वर्णी

या नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये अत्यंत मोलाची मानली जाणारी ‘प्रदेश युवती प्रमुख’ पदाची जबाबदारी नांदेड येथील 28 वर्षीय शंभवी साळे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. राज्यातील तरुणींचे नेटवर्क मजबूत करणे, त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडणे आणि तरुणींना पक्षाच्या विचारधारेशी जोडणे, ही प्रमुख आव्हाने शंभवी साळे यांच्यासमोर असतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षातील युवती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राज्यातील विविध विभागांना योग्य प्रतिनिधित्व देऊन तरुण मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती भाजपने या माध्यमातून आखली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत यादी
1. विक्रम जैन (वय: 34) – उपाध्यक्ष (रत्नागिरी, कोकण)
2. मयुर दौंडकर (वय: 28) – उपाध्यक्ष (पुणे, पश्चिम महाराष्ट्र)
3. भावार्थ दौंड (वय: 31) – उपाध्यक्ष (कल्याण, ठाणे)
4. शुभम जायभाय (वय: 31) – उपाध्यक्ष (बुलढाणा, विदर्भ)
5. मयुर वंझारी (वय: 34) – उपाध्यक्ष (छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा)
6. सौरभ चौहान (वय: 35) – उपाध्यक्ष (लातूर, मराठवाडा)
7. वैभव वायचाळ (वय: 34) – उपाध्यक्ष (वाशिम, विदर्भ)
8. अंकुश ठाकुर (वय: 35) – उपाध्यक्ष (वर्धा, विदर्भ)
9. श्रेयस शाहकर (वय: 25) – उपाध्यक्ष (देवगड, सिंधुदुर्ग)
10. सौरभ पुंडलिक (वय: 31) – उपाध्यक्ष (पुणे, पश्चिम महाराष्ट्र)
11. बादल राऊत (वय: 32) – महामंत्री (नागपूर, विदर्भ)
12. सुदर्शन यादव (वय: 32) – महामंत्री (सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र)
13. तेजस्विनी दुर्गे (वय: 30) – महामंत्री (पिंपरी-चिंचवड, पश्चिम महाराष्ट्र)
14. दत्तप्रसाद जाधव (वय: 35) – महामंत्री (बीड, मराठवाडा) 15. अनिमेष कुलकर्णी (वय: 28) – सचिव (सातारा, पश्चिम महाराष्ट्र)
16. अद्वैत कुलकर्णी (वय: 29) – सचिव (रत्नागिरी, कोकण) 17. अमेय विश्र्वरुप (वय: 35) – सचिव (नागपूर शहर, विदर्भ) 18. राज चव्हाण (वय: 30) – सचिव (जळगाव, उत्तर महाराष्ट्र) 19. राहुल नरोटे (वय: 32) – सचिव (जालना, मराठवाडा)
20. योगेश चांदवडकर (वय: 30) – सचिव (इगतपुरी, उत्तर महाराष्ट्र)
21. जयेश भोसले (वय: 26) – सचिव (कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र)
22. अतुल जैन (वय: 34) – सचिव (मुंबई, मुंबई)
23. अॅड. मिलिंद नांदगावकर (वय: 35) – सचिव (रत्नागिरी, कोकण)
24. अॅड. बाळकृष्ण कायपेलवार (वय: 34) – सचिव (यवतमाळ, विदर्भ)
25. विरेंद्र ठाकुर (वय: 35) – कोषाध्यक्ष (मुंबई, मुंबई)
26. यश सातपुते (वय: 34) – सहकोषाध्यक्ष (नागपूर, विदर्भ) 27. यश तायडे (वय: 22) – कार्यालय प्रमुख (मुंबई, मुंबई)
28. प्रदिप सकपाळ (वय: 29) – सोशल मीडिया प्रमुख (नवी मुंबई, कोकण)
29. शंभवी साळे (वय: 28) – युवती प्रमुख (नांदेड, मराठवाडा)

जिल्हा अन् तालुका स्तरावर लवकरच नवे फेरबदल

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या युवा आघाडीला अधिक सक्रिय आणि गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रदेश स्तरावरील या 29 नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर आता लवकरच जिल्हा तसेच तालुका पातळीवरही युवा मोर्चाच्या नव्या टिमची घोषणा केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तरुण मतदारांपर्यंत पक्षाचे ध्येयधोरण पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज झाली असून, येत्या काळात भाजप युवा मोर्चाचा आक्रमक आणि नवीन चेहरा राजकारणात पाहायला मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version