BMC Election: BMC Election: कॉंग्रेसचंही ठरलं! वंचितसोबत युतीची अधिकृत घोषणा; जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट

नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर आता कॉंग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

BMC Election: BMC Election: कॉंग्रेसचंही ठरलं! वंचितसोबत युतीची अधिकृत घोषणा; जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट

नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महायुतीसोबतच मविआमध्ये देखील मोठी उलथापालथ आणि नाराजीनाट्य पाहायला मिळाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा- Thalapathy Vijay Retirement: धक्कादायक! थलापती विजयचा चित्रपटसृष्टीला कायमचा 'रामराम'; 33 वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीनंतर आता निवडले 'हे' क्षेत्र

दरम्यान राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर आता कॉंग्रेसने मोठा निर्णय घेतला. ठाकरे बंधूंच्या आणि राष्ट्रवादीच्या आपापसातल्या युतीनंतर कॉंग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचे चित्र समोर आले आहे. मविआमधील मनसे-शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युतीनंतर आणि राष्ट्रवादी अजित-शरद पवार यांच्यातील युतीनंतर कॉंग्रेस कोणासोबत युती करणार याची प्रतिक्षित लागली होती. अशातच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची बहुप्रतिक्षित युती अखेर आज जाहीर करण्यात आली. यामुळे मोठी राजकीय घडामोड झाली आहे. 

हेही वाचा- Kolhapur Election 2026: कोल्हापुरात मोठा राजकीय ट्विस्ट; अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णराज महाडिकांची माघार, काय आहे कारण?

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच राष्ट्रीय सचिव सचिन सावंत आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षातील युतीची घोषणा करण्यात आली आहे. एवढच नव्हे तर युतीसोबतच दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला 227 पैकी 62 जागा देण्यात आल्या असून उर्वरित 165 जागांवर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number