BMC Election 2026 : ‘बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही…’; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

'बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, (बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी)' असे विधान भाजप नेत्याने केल्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरले असून, मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.<br/>

BMC Election 2026 : ‘बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही…’; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजप नेते के. अण्णामलाई यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, (बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी)’ असे विधान अण्णामलाई यांनी केल्यामुळे विरोधकांनी भाजपला घेरले असून, मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

अण्णामलाई नेमके काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अण्णामलाई यांनी मुंबईतील ‘ट्रिपल इंजिन’ सरकारची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे जिथे केंद्र, राज्य आणि महापालिका अशा तिन्ही स्तरावर एकाच पक्षाचे सरकार शक्य आहे. मुंबईचे 75 हजार कोटींचे बजेट पाहता, हे शहर केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर आहे.” चेन्नई आणि बंगळुरू यांच्याशी तुलना करत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी भाजपचा महापौर हवा, असा युक्तिवाद केला.

हेही वाचा – PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं ‘हमीपत्र’, मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री ‘टॅब’

विरोधकांचा संताप आणि निषेध

अण्णामलाई यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठाकरे गट शिवसेना नेते संजय राऊत यांनी अण्णामलाई यांच्यावर कडक शब्दांत प्रहार केला. “हे विधान 106 हुतात्म्यांचा अपमान आहे. अण्णामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी सरकारच्या श्रीमुखात लगावली असून, देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देणार?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने केलं स्वीकृत नगरसेवक; स्थानिकांमध्ये संतापाची लाट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या (शरद पवार गट)  सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि ती कुणीही तोडू शकत नाही. हे विधान अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number