ZP And Panchayat Samiti Election 2026 : पवार गटानं तिकीटं डावललं, शिंदे गटानं दिली संधी; ‘या’ उमेदवाराचा साध्या पद्धतीने प्रचार सुरू

राजकारणापेक्षा समाजकारणाचचं काम कायम ठेवून आपण जनतेचा विश्वास जिंकू, असे मत सारिका करपे यांनी व्यक्त केले आहे.

ZP And Panchayat Samiti Election 2026 : पवार गटानं तिकीटं डावललं, शिंदे गटानं दिली संधी; ‘या’ उमेदवाराचा साध्या पद्धतीने प्रचार सुरू

शिरूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली असताना जिल्हा परिषद निवडणुकीत कोणतीही धामधूम न करता शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सारिका करपे यांनी साध्या पद्धतीने प्रचार सुरू ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक राजकारणामुळे डावलले गेले असले तरी, आपण व कुटुंबियांनी केलेल्या सामाजिक कार्यावर जनतेचा विश्वास असून जनता आपल्याला विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याशी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी संवाद साधला आहे. 

हेही वाचा : Mahadev Jankar On Ajit Pawar Death : “…अन् दादांसोबतचा तो प्रवास करता आला नाही” महादेव जानकर अजित पवारांच्या विमानातून करणार होते प्रवास

यापूर्वी सारिका करपे या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटात) होत्या. मात्र त्यांनी निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांना शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीची संधी देण्यात आली. त्यामुळे राजकारणापेक्षा समाजकारणाचचं काम कायम ठेवून आपण जनतेचा विश्वास जिंकू, असे मत करपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने प्रचार सुरू ठेवतं जनसंपर्क साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आता जिल्हा परिषदेच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. 

हेही वाचा : ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारख्या बदलल्या; आता ‘या’ तारखेला होईल मतदान आणि मतमोजणी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number